बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही? अशा पद्धतीने ऑनलाईन तपासा घरीबसल्या.

आज आपण सदरलेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत देण्यात येते. परंतु या योजनेचे पैसे अजूनही काही महिलांच्या खात्यात आलेले नाहीत. चला तर मग सदर लेखातून या मागील कारणे जाणून घेऊयात व तसेच त्यावरील उपाय जाणून घेऊयात.

लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँक अकाउंट हे आधार कार्डची लिंक असणे गरजेचे आहे. जर बँक खाते हे आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा की महिलांना लगेच आपले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करून घ्यावे लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील सरकारची प्रक्रिया व आश्वासन-

राज्य सरकारच्या माध्यमातून 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहेव तसेच 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे आश्वासन देखील सरकारने दिले आहे. तरी देखील काही कारणामुळे पैसे उशिरा देखील जमा होऊ शकतात.

आधार कार्ड व बँक खाते लिंकिंगचे महत्व-

आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा बनला आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. उदा. एलपीजी सबसिडी, स्कॉलरशिप, पेन्शन यासारख्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे.

तसेच बँक खात्याशी आधार लिंक असल्यास बँक व्यवहार अधिक सुरक्षित व सुलभ होतात. त्याचबरोबर यामुळे सरकारी योजनेचा लाभ थेट सबसिडीच्या किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ मिळवू शकतात. म्हणूनच तुमचे खाते हे आधार लिंक आहे की नाही हे तपासणी अत्यंत गरजेचे आहे.

बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक करावे?-

  • सर्वात अगोदर UIDAI च्या uidai.gov.in/mr/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • वेबसाईट उघडल्यानंतर My Aadhaar या टॅब वर क्लिक करावे व त्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये ‘आधार सेवा’ हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतर आधार सेवा विभागात ‘आधार व बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • पेज उघडल्यावर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा.
  • नंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करावे व तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP त्यामध्ये टाकावा. OTP टाकल्यानंतर तुमचे खाते  आधारशी लिंक आहे की नाही हे लगेच समजेल.

बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर काय करावे?-

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे.
  • बँकेत गेल्यानंतर तुम्हाला आधार लिंकिंगसाठी एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुमच्या खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडून तुमचे केवायसी दस्तऐवज तपासले जातील. यात तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड यांची माहिती देणे गरजेचे आहे.
  • सर्व आवश्यक तू तपशील दिल्यानंतर काही मिनिटातच तुमचे बँक खाते आधार कार्डकशी लिंक केले जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *