खरेदीखतासाठी व इतर दस्तऐवजांसाठी न वापरलेला स्टॅम्प रिफंड करण्याची मुदतवाढ.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून खरेदीखत व इतर दस्ताऐवजासाठी न वापरलेला स्टॅम्प यामध्ये देण्यात येणाऱ्या मुदत वाढीमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

कोणतीही मालमत्ता घेताना कराराच्या वेळी नोंदणी करताना मुद्रांक शुल्क हा भरावा लागतो. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी होत नाही. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या सुधारणा-

  • स्टॅम्प रिफंड करण्यासाठी मुदतवाढ- या अगोदर मुद्रांक शुल्क भरण्याच्या तारखेपासून सहा महिन्याचा आत दस्तऐवजी नोंदणी करणे गरजेचे होते. परंतु यात आता वाढ करण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्क भरण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत दस्तऐवजींची नोंदणी आता करता येणार आहे.
  • नोंदणीकृत दस्तातील मुद्रांक शुल्क- या अगोदर नोंदणीकृत असलेल्या कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कास दंड हा 2% होता. परंतु आता त्यात बदल करून नोंदणीकृत असलेल्या कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कास दंड हा 1% करण्यात आलेला आहे.
  • नोंदणीकृत नसलेल्या दस्तातील मुद्रांक शुल्क- या अगोदर नोंदणीकृत नसलेल्या कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कास दंड हा 2% आकारला जात होता. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच तो 2% ठेवण्यात आलेला आहे

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *