माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आता या दिवशी मिळणार. तसेच या योजनेबद्दलचे महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख ही ठरवण्यात आलेली आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांनी खालील काम करणे देखील गरजेचे आहे.

तेव्हाच महिलांना या पहिल्या हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेचा पहिला हप्ता कधी व किती तारखेला मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांनी कोणते काम केले पाहिजे याबद्दलची माहिती.

सदर योजनेचा पहिला हप्ता किती तारखेला मिळणार आहे-

या अगोदर महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजनेच्या हप्त्यासाठी 19 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आलेली होती. परंतु यात आता बदल करण्यात आलेला आहे. या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता हा एकत्रित 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात रु.3000/- जमा केले जाणार आहेत.

सदर योजनेचा अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी लगेच करा हे काम-

ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांनी फॉर्म भरताना जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे तो आपल्या आधार कार्डची लिंक आहे की नाही ते पाहावे. जर बँक खाते क्रमांक हा आधार कार्डशी लिंक नसेल तर तात्काळ तो लिंक करून घ्यायचा आहे.

जर बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर काय करावे-

  • जर एखाद्या महिलेच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर त्या महिलेने  पोस्टमध्ये जाऊन खाते उघडणे गरजेचे आहे.
  • तसेच ज्यावेळी आपण अर्ज सादर करत होतो त्यावेळी जर आपण जिल्हा  बँकेचे खाते जमा केलेले असेल तरी देखील जर त्या महिलेचे पोस्टमध्ये खाते असेल तर त्यांचे पैसे पोस्टमध्ये जमा होणार आहेत.
  • त्यामुळे ज्यांच्या खात्याला बँक इन ऍक्टिव्ह आहे किंवा आधार शेडिंग कोणतीच बँक लिंक नसेल तर त्या महिलांनी आपले खाते पोस्टमध्ये उघडणे हा एकमेव पर्याय आहे.

सदर योजनेचे महत्त्वाचे मुद्दे-

  • ज्या महिलांचा फॉर्म Approve झालेला आहे, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
  • ज्या महिलांचा फॉर्म हा Pending आहे त्या महिलांना तो फॉर्म Approve होण्याची वाट पहावी लागणार आहे.
  • ज्या महिलांचा फॉर्म In Review मध्ये आहे त्या महिलांचा फॉर्म लवकरच Approve होईल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल.
  • जर फॉर्म हा Disapprove झालेला असेल तर Edit बटन वर क्लिक करून परत फॉर्म दुरुस्त करून Submit करावा. जर फॉर्म हा Edit होत नसेल किंवा Edit Option येत नसेल तर पुढच्या अपडेटची वाट पहावी.
  • जर फॉर्म हा Reject झालेला असेल तर नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. परंतु नवीन फॉर्म हा सध्या भरला जात नाही. त्यामुळे पुढचे अपडेट येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
  • फॉर्म हा Approve झाला आहे पण SMS Verification Pending आहे. त्यांनी काहीच करू नये त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • नवीन फॉर्म App द्वारे भरले जाणार नाहीत. त्यावरून तुम्ही फक्त स्टेटस चेक करू शकता. तेही फक्त रात्री चालते.
  • वेबसाईटवरून फॉर्म भरताना खूप अडचण येत आहेत. त्यामुळे चार-पाच दिवस थांबून त्यानंतर फॉर्म हा भरावा. आता फॉर्म हा भरला जात नाही.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *