आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे झाले असेल तर त्यांना नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याची प्रक्रिया ही चालू झालेली आहे.
मागील महिन्यामध्ये महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी व पूर यामुळे भारत देशामध्ये शेतकरी व संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर संपूर्ण देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे.
या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये जी पूरस्थिती व अतिवृष्टी झालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे किंवा घराचे नुकसान झालेले आहे अशा ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत.
आपल्याला नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी कोणता फॉर्म भरावा लागणार आहे तसेच याची प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती.
कोणाला नुकसान भरपाई मिळणार आहे-
- ज्या शेतकऱ्यांची जमीन ही नदीच्या कडेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे परंतु यासाठी पंचनामा करणे गरजेचे आहे.
- तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे.
- एखाद्या कुटुंबाचे पावसामुळे जर नुकसान झाले असेल तर त्यांना देखील नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे.
पीक नुकसान भरपाईसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा
- 8 अ उतारा
- विहित नमुन्यातील अर्ज
- नुकसानग्रस्त पिकाचा फोटो
अर्ज प्रक्रिया ही कशी असणार आहे-
- सर्वात अगोदर आधार कार्ड, बँकेचे पासबुक, विहित नमुन्यातील अर्ज, सात बारा व आठ ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून या कागदपत्रांना आपल्या ज्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्या पिकाचा प्रत्यक्ष ठिकाणाचा फोटो काढून फॉर्म वरती जोडायचा आहे.
- ही सर्व कागदपत्रे गोळा करून तलाठी यांच्याकडे सादर करायची आहेत.
- तलाठी सदर ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करतील व सर्व अहवाल तालुका व जिल्हा या ठिकाणी सादर करतील.
- त्यानंतर शासनाकडून यासाठी निधी देण्यात येईल.
सूचना- जर आपणास पीक नुकसान भरपाईचा फॉर्म पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तो फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा. हा फॉर्म डाऊनलोड करून आपल्याला सादर करायचा आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.