FASTag सेवांवरचे नवीन नियम.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. टोलनाक्यावरती प्रवाशांना वाट पहावी लागू नये, यासाठी 1 ऑगस्ट पासून FASTag सेवांवरील नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमांच्या माध्यमातून टोल भरण्याची प्रक्रिया सुधारणे व टोलबुथ वरील गर्दी कमी करणे यावर भर देण्यात आलेला आहे.

1 ऑगस्ट पासून FASTag सेवांवर नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. नवीन वाहन घेतल्यानंतर वाहनाचा नोंदणी क्रमांक आता 90 दिवसांच्या आत FASTag नंबर वर अपलोड करणे गरजेचे आहे. जर निर्धारित वेळेत हा नंबर अपलोड केला नाही तर तो हॉटलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यानंतर 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येणार आहे.

पण त्याही कालावधीमध्ये वाहन क्रमांक अपडेट नाही केला तर FASTag ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला जाणार आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे FASTag सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत पाच ते तीन वर्ष जुने सर्व FASTag केवायसी करावी लागणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

FASTag बाबतचे नवीन 7 बदल-

  • 5 वर्षाहून जुना FASTag बदलावा लागणार आहे.
  • 3 वर्ष जुना FASTag केवायसी करावी लागणार आहे- तीन वर्षांपूर्वी जारी करण्यात आलेल्या FASTag KYC अपडेट करणे गरजेचे आहे.
  • वाहनाचा तपशील लिंक करावा लागणार आहे- वाहन नोंदणी क्रमांक व चेसिस क्रमांक FASTag शी लिंक करणे गरजेचे आहे.
  • नवीन वाहन नोंदणी अपडेट- नवीन वाहन खरेदी केल्यानंतर 90 दिवसाच्या आत नोंदणी क्रमांक अपडेट करावा लागणार आहे.
  • डेटाबेस पडताळणी- FASTag पुरवठादारांना त्यांच्या डेटाबेसची पडताळणी ही करावी लागणार आहे.
  • फोटो अपलोड करणे गरजेचे आहे- कारच्या पुढील व बाजूचे स्पष्ट फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.
  • मोबाईल नंबर लिंक करणे- FASTag मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *