माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकला असेल, तर असा करा दुरुस्त.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर आपण लाडकी बहिणी योजनेसाठी याअगोदर अर्ज केलेला असेल व आपला अर्ज बाद झालेला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आपला अर्ज हा पुन्हा दुरुस्त करू शकणार आहोत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अर्ज पुन्हा दुरुस्त कसा करता येणार आहे.

लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये 19 ऑगस्ट 2024 रोजी पैसे जमा होणार आहेत. ट्रायल बेसवर आता ज्या माता-भगिनींचे फॉर्म Approval केले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत व ज्या माता-भगिनींचे अर्ज Disapproval झालेले आहेत त्यांना आता पुन्हा फॉर्म म्हणजेच अर्ज Resubmit करायचा आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया

  • सर्वात अगोदर आपण ज्या नंबरद्वारे नारीशक्ती दूत अ‍ॅप वरती अर्ज भरलेला आहे तेथे लॉगिन करायचे आहे.
  • नंतर यापूर्वी केलेला अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला समजेल आपला फॉर्म रिजेक्ट किंवा डी अप्रूव्हल किंवा Approve झाला आहे की नाही.
  • जर अर्ज रद्द केलेला असेल तर त्या अर्जावर क्लिक करावे.
  • आता आपल्यासमोर कारण दिसेल म्हणजे जी कागदपत्रे आपल्याला जोडायला सांगितलेले आहेत ती आपण जोडावीत व परत आपला अर्ज हा सादर करावा.
  • पुन्हा अर्ज अपडेट करताना कोणतीही माहिती चुकणार नाही याची काळजी घ्यावी व कागदपत्रे अपलोड करावीत. 48 तासांमध्ये आपला फॉर्म अपडेट होईल व आपला अर्ज Approve होईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *