आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मागील चार वर्षापासून आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी ई-पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यावर्षी जे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पिक विमा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केलेली असून 1 ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाने आव्हान केले आहे की मुदतीच्या आत ई-पीक पाहणी करुन घ्यावी.
पीक विमा व नुकसान भरपाईसाठी आवश्यक-
पीक विमा किंवा नुकसान भरपाई पाहिजे असेल तर ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की आपल्या शेतातील जे पीक हंगामानुसार घेतलेले आहे त्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर नोंद ही अचूक व पारदर्शकपणे करता येण्यासाठी राज्यात ई-पीक पाहणी हा उपक्रम राबवण्याला जात आहे.
ई-पीक पाहणीबद्दलची माहिती-
आता शेतकऱ्यांना आपली पीक पाहणी करण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. एका मोबाईलद्वारे 50 पीक पेरणीच्या नोंदी करता येणे शक्य आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचा मोबाईल हा शेतात चालत नसेल तर अन्य शेतकऱ्यांच्या मोबाईलद्वारे ही नोंदणी करतात येऊ शकते.
तसेच खरीप हंगाम 2024 साठी पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेले आहे. बांधावरील झाडांच्या नोंदणीसाठी देखील पर्याय उपलब्ध आहेत. एप्लीकेशनच्या नवीन व्हर्जनमध्ये शेतकरी आपल्या नोंदीत 48 तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतात.
शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची आहे का असा प्रश्न देखील तेथे विचारला जातो. तशी नोंदही आपल्याला त्या ठिकाणी करता येते. या अगोदर एक मुख्य व दोन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवता येत होती. तसेच आता तीन दुय्यम पिके देखील नोंदवणे शक्य आहेत.
ई- पीक पाहणीचे फायदे-
- ई-पीक पाहणी मुळे कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे.
- ई-पीक पाहणी अॅपमध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येणार आहे.
- तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाची पेरणी किती टक्के झाली आहे हे देखील अचूक समजणार आहे.
ई-पीक पाहणी अॅप कसे घ्यावे-
ई-पीक पाहणी अॅप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करावे. त्यामध्ये ई-पीक पहाणी 2.0 असे नाव शोधा. आपणास ई-पीक पाहणी हे ॲप दिसेल. त्यानंतर ते इन्स्टॉल करा. किंवा खाली दिलेल्या लिंक वरून ते डाऊनलोड करा.
अशी भरा नवीन खातेदाराची माहिती-
- नवीन खातेदार नोंदणी करा.
- तुमचा विभाग निवडा.
- तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडा.
- तुमचे नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कोणत्याही एका पर्यायाची निवड करुन माहिती भरावी.
- त्यानंतर शोधा या बटणावर क्लिक करा.
- खातेदार निवडावर क्लिक करुन आपले नाव निवडा.
- आता पुढील बटनावर क्लिक करा.
- आपला मोबाईल क्रमांक भरा. त्या नंबरवर जो OTP येईल तो भरावा.
आता आपली खातेदार नोंदणी पूर्ण झालेली आहे.
या पद्धतीने भरा ई-पीक पाहणी माहिती-
खातेदाराचे नाव निवडा
- 4 अंकी संकेतांक भरा (जर संकेतांक माहिती नसेल तर संकेतांक विसरलात यावर क्लिक करावे)
- त्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायवर क्लिक करावे.
- खाते क्रमांक निवडा
- गट क्रमांक निवडा
- तुमचे एकूण क्षेत्र दाखवेल
- तुमचे पोट खराब क्षेत्र दाखवेल
- हंगाम कोणता आहे तो निवडा
- एकूण पेरणीयोग्य क्षेत्र दाखवेल
- पिकाचा वर्ग निवडा
- पिकाचा प्रकार निवडा(पीक/ फळबाग)
- पिकाचे नाव निवडा
- जल सिंचनाचे साधने निवड करा
- सिंचन पद्धत निवडा
- लागवडीचा दिनांक अचूक भरा
- अक्षांश रेखांश मिळवा यावर क्लिक करा
- त्यानंतर आपल्या पिकाचा फोटो घ्या
- सर्वात शेवटी सबमिट या बटनवर क्लिक करा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.