पाईपलाईन अनुदान योजना. आता फक्त भरा 24 रुपयांमध्ये अर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोता. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी पाईपाची खरेदी ही करावी लागत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील वाढत असतो. यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप त्याचबरोबर एचडीपीए पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान देखील देण्यात येत असते. शेती मधून शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर पाण्याची आवश्यकता असते. यामुळेच राज्य सरकारच्या माध्यमातून पाईपलाईन अनुदान योजनाही राबवण्यात येत आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेचा माध्यमातून किती अनुदान मिळते, अर्ज कोठे करावा लागतो याबद्दलची माहिती.

सदर योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते-

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी 35 रुपये प्रति मीटर याप्रमाणे 500 मीटर पर्यंत अनुदान देण्यात येते. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून कमाल 15 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एचडीपी पाईप खरेदी करण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर याप्रमाणे 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून कमाल 15 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते.

सदर योजनेचे अटी व नियम-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावे सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी शेतकरी हा दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून पाईप खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते व उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतःकडील भरावी लागते.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • बँक पासबुक
  • डीलरशिपचे कोटेशन

सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-

या योजनेचा अर्ज हा खाली दिलेल्या शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर करावा. हा अर्ज करताना पाण्याच्या स्रोताची माहिती द्यावी लागते. अर्ज करून झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. हा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शुल्क म्हणून 23.60 रुपये भरावे लागतात. म्हणजेच फक्त 24 रुपयात अर्ज केल्यानंतर 15 हजार रुपयांचे अनुदान पाईप खरेदी करण्यासाठी दिले जाते.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

महाडीबीटी पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *