काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणारे 1 रुपया.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजनेतील काही खात्यामध्ये 1 रुपया जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

लाडक्या बहिणी योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त-

राज्यभरात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.

लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून दोन महिन्याचे पैसे ऑगस्ट महिन्यातच  पात्र महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून प्राप्त महिलेच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत.

निवड महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा-

जुलै अखेर लाडक्या बहिणी योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून तांत्रिक पडताळणी केली जात आहे. त्यामुळे निवडक महिलांचा खात्यात 1 रुपया जमा केला जाणारा असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिला आहे.

हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजला बळी पडू नये असे आव्हान आदिती तटकरे यांनी केले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *