मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. देशातील जेष्ठांना महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा.

आज आपण सदर लेखातून आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील सर्वधर्म मधील जेष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केला आहे.

या योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेसाठी लागणारी पात्रता व अपात्रता, या योजनेची सविस्तर माहिती, या योजनेचा GR, या योजनेची कागदपत्रे इत्यादी बद्दलची माहिती.

सदर योजनेची माहिती-

या योजनेच्या माध्यमातून भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांचे दर्शन मोफत करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेच्या माध्यमातून निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एका वेळेला लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल.

सदर योजनेचे उद्दिष्ट-

राज्यामध्ये जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष 60 व त्यावरील जेष्ठ नागरिक पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

सदर योजनेची अपात्रता-

  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेम्ध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाही. परंतु रुपये 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या पदावर आहेत.
  • त्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा नावर नोंदणीकृत आहेत.
  • प्रवासासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे व कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी.बी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बेसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी
  • अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्टीने निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.( हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुनी नसावे.)
  • जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशी माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही.
  • जर अर्जदार प्रवाशाचे खोटी माहिती आढळून आली किंवा कोणती तथ्ये लपवून अर्ज केला आहे. ज्यामुळे तो/तिला प्रवासासाठी अपत्र ठरते, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशन कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/जन्म दाखला/ रेशन कार्ड/मतदान ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (15 वर्षांपूर्वीचे यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)
  • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला)
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल क्रमांक जवळच्या नातेवाईकाचा
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे बाबतचे हमीपत्र

सदर योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया-

या योजनेचा अर्ज हा पोर्टल/मोबाईल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येणार आहे.

  • जे जेष्ठ नागरिक पात्र आहेत त्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  • ज्या जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांनी आपला अर्ज हा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन भरावा.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत आहे.
  • अर्ज करताना त्या व्यक्तीने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. जेणकरून त्याचा थेट फोटो काढता येईल व KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणने गरजेचे आहे.
  1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड
  2. स्वतःचे आधार कार्ड

सूचना- या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला GR डाऊनलोड करा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *