बँक KYC करण्यासाठी लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही; आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेत जाण व तासभर रांगेमध्ये उभे राहणे जुने झाले आहे. कारण बहुतेक प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. आता KYC अपडेट करण्यासाठी देखील बँक मध्ये जाण्याची गरज नाही.

भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ग्राहकांसाठी नवीन सोय उपलब्ध करून दिली आहे. जर तुमची KYC कागदपत्रे बरोबर आहेत व त्यामधील पत्त्यात काही बदल नाही तर असे ग्राहक आता ऑनलाईन पद्धतीने केवायसी अपडेट करू शकतात. या अगोदर KYC करण्यासाठी बँक शाखेत जाणे गरजेचे होते.

पण आता RBI ने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे. ज्या ग्राहकांनी अगोदर KYC करण्यासाठी वैद्य कागदपत्रे जमा केली आहेत व त्या ग्राहकांचे पत्ते देखील बदललेले नाही अशा ग्राहकांसाठी आता ऑनलाईन KYC अपडेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन KYC अपडेट कशी करावी?-

  • सर्वात अगोदर तुमच्या बँकेचे ऑनलाईन बँकिंग पोर्टलवर लॉग इन करावे.
  • नंतर KYC टॅब शोधा व त्यावर क्लिक करावे.
  • समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करावे व त्यात तुमची माहिती जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी भरावी.
  • आता नंतर आधार, पॅन व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड कराव्यात. दोन्ही बाजूंची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी.
  • त्यानंतर ‘सबमिट’ बटन वर क्लिक करा. तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल व बँक तुम्हाला SMS किंवा ई-मेल द्वारे प्रगतीबद्दल माहिती देत राहते.

परंतु काही प्रकरणांमध्ये KYC अपडेट करण्यासाठी बँक शाखेत जाणे आवश्यक असू शकते. जर तुमची KYC कागदपत्रे एक्सपायर झाली असेल किंवा अजून वैद्य नसतील तेव्हा असे होऊ शकते. बँक शाखेमध्ये जाताना तुम्हाला यादीमध्ये दिलेली कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागणार आहेत.

KYC अपडेट न केल्यास काय होते?-

KYC या प्रक्रियेने बँका ग्राहकांची ओळख आणि पत्त्याची माहिती गोळा करतात. या माहितीचा वापर हा ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी व त्यांच्या जोखीम मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त ठरतो. KYC प्रक्रिया ही सेवांचा गैरवापर टाळण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडते.

जर KYC माहिती अपडेट नाही केली तर तुमच्या व्यवहारावर निर्बंध येऊ शकतात किंवा तुमचे बँक खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे खाते किंवा आर्थिक क्रिया-कलापांसाठी वापरू शकत नाही. परंतु खाते बंद होण्याच्या अगोदर KYC अपडेट नसल्यास बँक तुम्हाला त्याबद्दल सूचित करते. तेव्हा त्यावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने KYC अपडेट करू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *