मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नवीन 7 बदल. आता या महिला देखील अर्ज करू शकणार.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन 7 बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आता नवविवाहित महिलांना कोणते कागदपत्रे लागणार आहेत तसेच इतर योजनांचा लाभ मिळत असणारे महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात का असे 7 महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया कोणते 7 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत.

शासनाचे मोठे 7 निर्णय खालील प्रमाणे-

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिलेचे नाव हे रेशन कार्ड मध्ये असणे गरजेचे आहे. परंतु नवविवाहित महिलांचे रेशन कार्डमध्ये लगेच नाव लावणे अशक्य असल्याने, आता त्या अर्जदार महिलांना रेशन कार्ड ऐवजी त्यांचा लग्नाचा पुरावा म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करता येणार आहे.
  2. जर अर्जदार महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला असेल व ती आता महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असेल तर त्या महिलेला तिच्या नावाचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा शाळेचा दाखला यावरून अर्ज करता येणार आहे.
  3. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस मधले खाते ग्राह्य धरले जाणार नाही.
  4. या योजनेचा अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन करताना आता महिला प्रत्यक्ष समोर उपस्थित असणे गरजेचे नाही. आता महिलेच्या पासपोर्ट साईज फोटो वर देखील फोटो अपलोड करता येणार आहे.
  5. ज्या महिलांना पीएम किसान तसेच इतर योजनांचा लाभ मिळत असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  6. या योजनेसाठी पात्र महिलांची नावे म्हणजेच यादी अंगणवाडी सेविका, महा-ई-सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे जाहीर करण्यात येणार आहे.
  7. या योजनेचा महिलांना 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *