रेशन कार्ड धारकांनी हे काम करा नाहीतर रेशन धान्य मिळणे होणार बंद.

सदर योजनेची माहिती –

केंद्र सरकार मार्फत शिधा पत्रिकेवर वितरित केल्या जाणाऱ्या धान्य वितरणाच्या लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करण्यासाठी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया गेल्या काही महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले होते. परंतु अजूनही अनेक रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जर शिधापत्रिकेत ज्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत त्यांची ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर त्यांना धान्य दिले जाणार नाही, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे.

तसेच शासनाने असेही सांगितले आहे की, जर कोणत्याही रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी केली नाही व कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर राशन कार्ड मध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास त्यांचे नाव राशन कार्डतून हटवले जाईल. त्यामुळे आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करून रेशन कार्डची ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी.

जर तुम्हाला रेशन कार्डची ई-केवायसी करायची असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे रेशन दुकानदारांकडे घेऊन जावी लागतील. त्यांना तुम्हाला ई-केवायसी करायची आहे असे सांगावे लागेल. रेशन दुकानदाराकडे जाताना तुमच्या शिधापत्रिकामध्ये असलेले सर्व सदस्य व त्यांचे आधार कार्ड बरोबर घेऊन जावे लागणार आहेत . रेशन कार्ड संबंधित सर्व सदस्यांची पडताळणी ही ई-पॉश मशीनवर अंगठा ठेवून केली जाते.

या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करू शकता व रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करू शकता. चला तर मग आज सदर लेखातून जाणून घेऊया ई-केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती, ई-केवायसी कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती.

ई-केवायसी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे-

शिधापत्रिका

सर्व सदस्यांचे आधार कार्ड

मोबाईल नंबर

रेशन कार्ड ई-केवायसी कशी करावी?-

सर्वात अगोदर तुम्ही तुमचे रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन रेशन दुकानदाराकडे जावे लागेल.

त्यानंतर शिधापत्रिका व आधार कार्ड रेशन डीलरला द्यावे लागतील. त्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेची ई-केवायसी ई-पॉश मशीन द्वारे करण्यात येईल.

ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डशी सध्या लिंक असलेल्या सदस्यांची माहिती टाकून पडताळणी केली जाईल. अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी करून घेऊ शकता.

रेशन कार्ड ई-केवायसी कधीपर्यंत करून घ्यावी?-

रेशन कार्ड ई-केवायसी ही लवकरात लवकर म्हणजेच जुलै अखेरपर्यंत करून घ्यावी.

रेशन कार्ड ई-केवायसी कोठे करावी?-

रेशन कार्ड ई-केवायसी ही तुम्ही जिथे तुमचे रेशन धान्य घेत आहात त्या डीलरकडे करावी.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

रेशन कार्ड ई-केवायसी माहितीची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *