पिंक-ई-रिक्षा योजना 2024

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी,आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये इच्छुक महिलांना पिंक-ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक-ई-रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक-ई -रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी 10 हजार लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेचा उद्देश-

  1. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे आहे.त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
  2. राज्यातील होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे
  3. राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा.
  4. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना मिळावी.

सदर योजनेचे स्वरूप-

  1. ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल.
  2. नागरी सहकारी बँका/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/राष्ट्रीयकृत बँका/अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई -रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
  3. राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल.
  4. या योजनेची लाभार्थी महिला/मुली यांच्यावर 10 टक्के आर्थिक भार असेल.
  5. कर्जाची परतफेड ही 5 वर्षे म्हणजे 60 महिने

सदर योजनेची लाभार्थी पात्रता-

  1. या योजनेचा लाभ घेणारे महिलेचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  2. अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  3. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
  5. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
  6. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य दिले जाईल.
  7. तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  1. या योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येणार आहे.
  2. लाभार्थी महिलेले शासनाच्या इतर विभागामार्फत व राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  3. लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी.
  4. कर्ज फेडीची जबाबदारी ही लाभार्थी महिलेची असणार आहे.

सदर योजना कोण कोणत्या शहरासाठी लागू असणार आहे-

मुंबई उपनगर
ठाणे
पुणे
नाशिक
नागपूर
कल्याण
अहमदनगर
नवी
मुंबई
पिंपरी
अमरावती
चिंचवड
पनवेल
छत्रपती संभाजी
नगर
डोंबिवली
वसई
विरार
कोल्हापूर
सोलापूर

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  1. ऑनलाईन अर्ज
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  5. उत्पन्नाचा दाखला (3 लाखापेक्षा कमी)
  6. बँक खाते पासबुक
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. मतदान कार्ड
  9. रेशन कार्ड
  10. चालक परवाना
  11. रिक्षा लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र
  12. अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र

सूचना- या योजनेचा अर्ज अजून सुरू झालेला नाही. फक्त शासनाने GR जाहीर केलेला आहे. या योजनेचा अर्ज कोठे व कसा करावा याबद्दलची माहिती जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा आपणास लेखातून कळवले जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

GR येथून डाउनलोड करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *