1 रुपयात पिक विमा योजनेबाबतच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत.प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात 2016 च्या खरीप हंगामापासून राबवली जात आहे. महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. नवीन बदलानुसार गेल्यावर्षीपासून सर्व समावेश पिक विमा योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पिक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

तसेच गेल्या वर्षे राज्यात एकूण 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती, अशी माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 आहे. या पिक विमा योजने सहभाग नोंदवताना शेतकऱ्यांना काही गोष्टी माहिती असणे अत्यंत गरजेच्या आहेत. त्या महत्त्वाच्या कोणत्या 5 गोष्टी आहेत, चला तर मग आपण सदर लेखातून जाणून घेऊया.

सर्व कागदपत्रांवर सारखाच नाव असणे गरजेचे आहे का?-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते व सातबारा उतारा यावर एकसारखे नाव असावे . यात किरकोळ बदल असेल तर विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. परंतु याबाबत स्पष्टीकरण देताना कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे की आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु सातबारा उताऱ्यावर कधीकधी नावात किरकोळ बदल असला तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचणी येत नाही.

नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही, पण जर पूर्ण नाव, आडनाव वेगळे असल्यास ते चालणार नाही. नावात असलेला बदल विभाग कंपनी मार्फत तपासला जाईल व तपासणी अंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये असे आव्हान कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी किती पैसे लागतात-

पीक विमा योजनेचा अर्ज हा स्वतः ऑनलाईन देखील करता येतो. या योजनेचा अर्ज हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या pmfby.gov.in या वेबसाईटवर करावा. तसेच याशिवाय सामान सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून सुद्धा शेतकरी अर्ज करू शकतात. CSC केंद्रावर अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ 1 रुपया शुल्क देणे गरजेचे आहे.

विमा कंपनी ही CSC चालकांना प्रती शेतकरी 40 रुपये एवढे पैसे देणार आहे. परंतू शेतकऱ्यांनी स्वतःबरोबर या योजनेसाठी लागणारा सातबारा व 8-अ चा उतारा घेऊन जाणे आवश्यक आहे. डिजिटल सहीचा सातबारा व 8-अ उतारा या वेबसाईटवर काढता येतो. सातबाऱ्यासाठी 15 रुपये व 8-अ उताऱ्यासाठी 15 रुपये एवढे शुल्क लागते. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक फोटो, पिक पेरण्याचे घोषणापत्र ही कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे आहे.

जर या योजनेचा अर्ज करताना अधिकचे पैसे मागितल्यास तक्रार कोठे करावी?-

जर CSC चालकाच्यामार्फत योजनेच्या अतिरिक्त पैश्याची मागणी केल्यास तक्रार नोंदवता येते. यासाठी संपर्क क्रमांक कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेला आहे. तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे.
टोल फ्री क्रमांक- 14599/1447
व्हाट्सअप क्रमांक- 9082698142

विम्यासाठी पीक नोंदणी करताना काय काळजी घ्यावी?-

शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाची लागवड असलेल्या क्षेत्राचा विमा काढावा . विमा घेतलेले पीक प्रत्यक्ष शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर करण्यात येतो. या अगोदर राज्यात काही ठिकाणी सरकारी जमिनीवर विमा उतरण्याचे प्रकार निर्देशनास आले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत पूर्ण करावी. ई-पीक पाहणीमध्ये शेतकऱ्यांनी शेतात जे पीक नोंदवले आहे तेच विम्यासाठी ग्राह्य धरले जाईल.

अर्ज केला म्हणजे विम्यासाठी पात्र ठरणार असे होत नाही, कारण…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही लाभास पात्र ठरणार असे नाही होत. जर तुमच्या शेतमालाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास तुम्हाला 72 तासाच्या आत ती माहिती विमा कंपनीला द्यायची आहे. त्यानंतर विमान कंपनी व सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का नाही हे ठरवले जाईल व त्यानंतरच तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *