आज आपण सदर लेखातून महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना 2024 च्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) नवीन खाते केवळ फक्त 100 रुपयात उघडून दयायची अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्य सरकारच्या घोषित योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच महिलांना या सरकारच्या योजनांचा लाभा कोणत्याही जिल्हा बँकेतील शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील रक्कम जमा करता येऊ शकते. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल.
पुणे जिल्हा बँकेच्या 294 शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शंभर रुपयात खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिलीच बँक ठरली आहे. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना पंधराशे रुपये जमा होणार आहेत. त्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेचे संपर्क साधावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- रेशन कार्ड किंवा जन्म दाखला किंवा डोमेसाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
- बँक पासबुक ग्रामीण बँक सोडून पोस्ट ऑफिस बँक किंवा इतर नॅशनल बँक
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.