आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत.
सदर लेखातून चला तर मग जाणून घेऊया अर्ज कोठे करावा, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेची 6 फेब्रुवारी 2024 रोजी घोषणा करण्यात आली होती. याच्या शासन निर्णय म्हणजेच GR मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचावा.
सदर योजनेची पात्रता-
या योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय हे 31 डिसेंबर 2024 पर्यंत 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराकडे आधार कार्ड असावे, जर आधार कार्ड नसेल तर पावती किंवा मतदान कार्ड दिले जाऊ शकते. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांच्या आत असावे. त्यासाठी फक्त स्वयंघोषणा पत्र द्यावे लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असल्याचे स्वयंघोषणापत्र)
- इतर ओळखपत्रे जे शासनाने विहित केलेले आहेत
सदर योजनेचे आर्थिक सहाय्य-
या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात 3000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. ही रक्कम महिन्याला नाही तर वर्षातून एकदाच दिली जाणार आहेत.
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-
या योजनेचा अर्ज हा जिल्हा किंवा तालुक्यातील समाज कल्याण विभाग येथे करावा. अर्ज करण्यासाठी खालील दिलेली पद्धत अमलात आणावी.
1) सर्वात अगोदर आपल्या परिसरातील समाज कल्याण विभागाच्या ऑफिसला भेट द्यावी.
2) त्यानंतर अर्ज फॉर्म मिळवावा व तो अर्ज फॉर्म भरावा तसेच त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
3) पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर त्याच्या बरोबर कागदपत्रे जोडून तो अर्ज समाज कल्याण विभागात जमा करावा.
सदर योजनेच्या अर्जाची माहिती-
या योजनेचा अर्ज सध्या ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जात आहे. पीडीएफ स्वरूपात अर्ज मिळून प्रिंट काढून अर्ज भरावा लागेल. हा अर्ज समाज कल्याण विभागात जमा करायचा आहे. ऑनलाईन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.