मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ. जाणून घेऊया ती कशी?

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा फॉर्म पात्र महिलांना सहज भरता यावा यासाठी तीन स्तरीय सुविधा व ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

सदर योजनेच्या फॉर्म भरण्याच्या सुविधा-

  1. पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
  2. ग्रामपंचायत, नगर पंचायत, परिषद व महा पालिका कार्यालय येथे देखील अर्ज भरता येणार आहे.
  3. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्स मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे.

पात्र महिलांना ग्रामपंचायत, नगर पंचायत परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे अर्ज देता येतील. तसेच पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक यांच्याकडे तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्स मध्ये अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करता येत आहे.

या योजनेची शेवटची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. या योजनेचे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे. महिलांना कोणत्याही मध्यस्था मार्फत अर्ज भरण्याची गरज नाही अथवा कोणत्याही ठिकाणी अर्ज करताना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *