आज आपण सदर लेखातून महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारने नॅनो खतांवर 50% अनुदान देणारी योजनाही काल म्हणजे 6 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या योजनेचे उद्घाटन गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सदर योजनेचे उद्दिष्टे-
या योजनेच्या माध्यमातून ज्ञानो खतांचा वापर वाढून रासायनिक खतांचा वापर कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर हवा, पाणी व मृदा प्रदूषण कमी करण्यास मदत होते. शेतकऱ्यांना कमी किंमतीत खते उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करणे.
सदर योजनेचे वैशिष्ट्ये-
या योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नॅनो खतांवर 50% अनुदान दिले जाणार आहे.’ AGR-2′ नावाची ही योजना आर्थिक वर्षासाठी राबवली जाणार आहे. या योजनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी 100 दिवसांची मोहीम राबवली जाईल.
सदर योजनेतून केंद्र सरकारचा प्रयत्न-
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्यावरण पूरक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. नॅनो खत अनुदान योजना हे एक त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचबरोबर पर्यावरणालाही फायदा होईल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. नॅनो खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करणे गरजेचे आहे.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क-
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.