महिलांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करण्यात आलेला आहे. त्यातून रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून त्याला पर्याय देखील देण्यात आलेला आहे. परंतु अनेक जण नारी शक्ती दूत ॲप ऐवजी ऑफलाईन अर्ज भरत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना त्यांचा अर्ज ऑनलाईन अपलोड करताना पुन्हा हेलपाटा मारावा लागणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्याची तयारी केली आहे. परंतु चालू स्थितीला अर्ज हा फक्त अंगणवाड्यांमध्ये स्वीकारला जात आहे. बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाहीत. त्यामुळे त्या महिलांना ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाड्यांमध्ये देत आहेत. आता दिवसेंदिवस अर्जांची संख्या वाढणार आहे. अंगणवाडी सेविकांना ऑफलाईन अर्ज हा परत ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे.
त्यासाठी त्यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र अर्जदाराच्या अर्जांच्या प्रमाणात प्रति लाभार्थी ५० रुपये मिळणार आहेत. दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा तर त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचा पर्याय दिसतो, त्यामुळे अनेक जण 15 वर्षांपूर्वीचे जुने रेशन कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागद जोडून ऑफलाईन अर्ज जमा करत आहेत. परंतु या लाभार्थ्यांना पुन्हा त्यांचा अर्ज अपलोड करताना फोटो काढण्यासाठी तेथे जावेच लागणार आहे.
सदर योजनेचा अर्ज नारीशक्ती दूत ॲपद्वारे कसा भरावा –
- सर्वात अगोदर प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूध ॲप हे डाऊनलोड करावे. ॲप उघडल्यानंतर त्यामध्ये मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाकून त्याखालील आपण कोणत्या गटात मोडतो म्हणजेच सामान्य महिला, गृहिणी असे टाकाल.
- नंतर तो सबमिट करावा. सबमिट केल्यानंतर तिथे ओटीपी येईल, तो ओटीपी त्या ठिकाणी टाकावा. म्हणजे तेथे तुमचे प्रोफाईल तयार होईल. प्रोफाइल तयार झाल्यानंतर खालील बाजूला नारीशक्ती दूत, योजना, यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाइल असे पर्याय आहेत, त्यापैकी नारीशक्ती दूत वर क्लिक करा.
- आता नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय दिसेल, तो उघडून तिथे माहिती भरा.
- अर्जातील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आधार कार्ड, रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करावे लागेल. आता अर्जदाराचे हमीपत्र डाऊनलोड करावे व ते भरून ठेवावे म्हणजे त्याचा फोटो आपल्याला अपलोड करता येईल.
- आता सर्वात शेवटी तेथे फोटोचा पर्याय आहे. त्यामध्ये आपला स्वतःचा म्हणजेच लाभार्थी महिलेचा फोटो काढून त्यावर अपलोड करून अर्ज सबमिट करावा व अर्जाचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा.
समित्या नेमल्यावरच अर्जांची पडताळणी-
या योजनेच्या माध्यमातून शासन निर्णयातील बदलानुसार तालुकास्तरावरही समित्या नेमल्या जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष तसेच दोन सदस्य हे अशासकीय असणार आहेत. त्यांची नावे कोणाकडून घ्यायची हे अनिश्चित असून तहसीलदार ही संभ्रमात आहेत . प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन झाल्याशिवाय अर्जाची पडताळणी अशक्यच आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

