मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचे मुद्दे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बऱ्याचश्या महिलांनी यासाठी अर्ज देखील भरलेला आहेत.

परंतु काही महिलांना या योजनेचा फॉर्म भरताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे, म्हणजेच कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे, योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती आपण आज सदर लेखातून जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा फोटो
  • रेशन कार्ड किंवा जन्म दाखला किंवा डोमेसाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
  • बँक पासबुक ग्रामीण बँक सोडून पोस्ट ऑफिस बँक किंवा इतर नॅशनल बँक

सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत-

या योजनेचा अर्ज हा 31 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे.

सदर योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार-

या योजनेचा पहिला हप्ता हा 15 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-

  • या योजनेचा अर्ज हा दोन प्रकारे करता येणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर हा फॉर्म महा-ई-सेवा केंद्र मध्ये जमा करून नंतर तो ऑनलाईन पद्धतीने महा-ई-सेवा केंद्र भरणार आहे.
  • तसेच फॉर्म हा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल व त्यानंतर यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोचपावती देखील दिली जाईल.

सदर योजनेच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्जाची सुविधा नाही-

शासनाने ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज भरण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे असे सांगितले होते. परंतु सध्या स्थितीला पोर्टल द्वारे अर्ज भरण्याची सुविधा सामान्य जनतेसाठी उपलब्ध नाही. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तसेच ॲप, सेतू सुविधा केंद्र व सीएससी केंद्रावर अर्ज भरणे सुरू आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *