सरकार देत आहे 10वी पास मुला/मुलींना मोफत टॅबलेट व 6 GB डेटा

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून 2024 मध्ये 10 वी पास झालेल्या प्रत्येक मुला/मुलींना सरकार मोफत टॅबलेट व 6 GB डेटा देणार आहे. चला तर याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया.

सदर योजनेची माहिती-

या योजनेचे नाव महाज्योती फ्री टॅबलेट योजना 2024 असे आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2026 करता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 या योजनेच्या माध्यमातून MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. तसेच महाज्योती मार्फत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत 6GB इंटरनेट डाटा प्रती दिवशी पुरवण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून फ्री टॅबलेट व 6GB डेटा मिळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून हा लेख नक्की वाचा.

सदर योजनेचे फायदे-

या योजनेच्या माध्यमातून परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती मार्फत मोफत 6GB इंटरनेट डेटा प्रती दिवस  देण्यात येत आहे.

सदर योजनेच्या अटी-

  • या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गामधील असावा.
  • नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील विद्यार्थी असणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थी हा 2024 मध्ये 10वी पास असावा.
  • जे विद्यार्थी ग्रामीण भागात 10वी पास आहेत त्यांच्यासाठी 60% पाहिजे. तर शहरी भागात 10वी पास विद्यार्थ्यांसाठी 70% पाहिजेत.
  • विद्यार्थी हा 10वी नंतर सायन्स शाखेत प्रवेश घेणार असावा.

सदर योजनेचे आरक्षण-

सामाजिक प्रवर्गटक्केवारी
इतर मागासवर्गीय(OBC)59%
निरधीसूचित जमाती- अ (VJ-A)10%
भटक्या जमाती- ब (NT-B)8%
भटक्या जमाती- क (NT-C)11%
भटक्या जमाती- ड (NT-D)6%
विशेष मागास वर्गीय (SBC)6%

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • विद्यार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र/डोमासाईल प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्याचे 10वी गुणपत्रक
  • विद्यार्थ्याचे 11वी सायन्सला प्रवेश घेतल्याचे पत्र
  • क्रिमिलियर सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • कास्ट सर्टिफिकेट

सदर योजनेचा अर्ज कसा करावा-

  • महाज्योतीच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करावा.
  • त्यानंतर Application for MHT-CET/JEE/NEET-2026 या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • तसेच अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *