शिलाई मशीन अनुदान योजनेमध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

आज आपण सदर लेखातून अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे. या योजनेचा अर्ज करण्याची अगोदरची शेवटची तारीख ही 30 जून होती. ती आता वाढवण्यात आली आहे. तसेच महिलांना या योजनेच्या माध्यमातून केव्हा व कशाप्रकारे रक्कम दिली जाणार आहे याची देखील माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सदर योजनेची माहिती-

या योजनेच्या माध्यमातून महिलांना 15 हजार रुपये शिलाई मशीन घेण्यासाठी दिले जाणार आहेट. तसेच या योजनेच्या मध्यमातून 10 ते 15 दिवस प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये आपल्याला एका दिवसाला 500 रुपये इतकी रक्कम देखील मिळणार आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर

सदर योजनेचा अर्ज कसा करावा-

या योजनेचा अर्ज हा आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज केल्यानंतर तो आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जातो. तेथून प्रोसेस झाल्यानंतर पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी जातो. त्यानंतर राज्याच्या ठिकाणी जाऊन, तेथून पुढे खादी व ग्रामोद्योग यांच्याकडे जातो. खादी व ग्रामोद्योग या संस्थेतील काही लोक आपल्या गावात येतात व आपल्याला 10 ते 15 दिवसांचे प्रशिक्षण देऊन प्रति दिवस 500 रुपये भत्ता देऊन 15000 शिलाई मशीनसाठी दिले जातात.

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

हा अर्ज भरत असताना अर्ज करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष समोर असणे गरजेचे आहे.

सदर योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख-

या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै पर्यंत आहे.

सदर योजनेचे पैसे कधी जमा होणार-

ही अर्ज प्रक्रिया संपल्यावर त्यानंतर 10 ते 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण दिल्यानंतर थेट आपल्या बँक खात्यामध्ये 15 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *