सदर योजनेची माहिती-
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय देखील लगेच जाहीर करण्यात आला होता. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार कडून दिले जाणार आहेत. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- तसेच अंमलबजावणी व्यवस्थित व त्वरित व्हावी म्हणून सध्याचा बिपीएलचा जो डेटाबेस आहे त्याचा वापर करण्यास सांगितला आहे. यामुळे नोंदनीसाठी रांगा लावण्याची आवश्यकता पडणार नाही.
सदर योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी-
या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी हा 15 जुलैय होता. परतु आता त्या कालावधीत 31 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे.
सदर योजनेची वयाची अट-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अगोदर वयोमर्यादा ही 21 ते 60 इतकी होती. परंतु आता या वयोमर्यादेत आता बदल करण्यात आला आहे. ही वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष इतकी करण्यात आलेली आहे.
सदर योजनेची जमिनीची अट-
या योजनेची जमिनीची अट देखील आता काढण्यात आलेली आहे. आता कितीही क्षेत्र असेल तरीही अर्ज करता येणार आहे.
सदर योजनेसाठी अविवाहित मुलींना अर्ज करता येणार का-
आता 21 वर्षांपुढील अविवाहित महिलांना देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदार महिलेचा फोटो
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- डोमासाईल किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now