आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मंगळवारी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर देणार असल्याचे निवेदन केले आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी साठा शिल्लक असल्याने प्रति किलो 30 रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी जाहीर केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर पडल्याने दुधाच्या दरात मोठी घसरण झाली होती. गेल्या एक वर्षापासून गायीच्या दुधाला चांगला भावच मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने 5 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. परंतु त्यासाठी दूध संघाने प्रति लिटर किमान रक्कम द्यावी अशी अट घातली होती, त्यामुळे काही संघांनी पळवाटा काढत किमान रक्कम कमी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळत नव्हते. परंतु आता 30 रुपये प्रति लिटर दूध दर देणे बंधनकारक केले आहे.
यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदन केले. प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने प्रति लिटर 35 रुपये दर मिळणार असल्याचेही विखे पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटी आणि लोण्याचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदीवर झाला आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने अर्थसंकल्पात पाच रुपये अनुदान वाटण्याच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी सहकारी दूध संस्था तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेत, प्रति लिटर 30 रुपये भाव शेतकऱ्यांना द्यावा असे या बैठकीत ठरले. सरकार पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. ज्यामुळे 35 रुपये प्रति लिटर दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.