आज आपण सदर लेखातून आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
सदर योजनेतील नवीन मोठे बदल-
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे इत्यादी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
- तसेच 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच ही योजना सुलभ व सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील शेतीची अट वगळण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
- या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष ठेवण्यात आलेला होता, परंतु त्यात आता बदल करून तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे.
- या योजनेसाठी परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र हे पुरावे ग्राह्य धरण्यात येतील, असा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.
- जर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबाकडे अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
- कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धाया योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेतील सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्यात यावा असा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदेश दिला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now