उद्या अर्ज सुरू होणार, ही कागदपत्रे लागतील. अर्ज कोठे करावा.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. परवा दिवशी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार अशी घोषणा देखील करण्यात आली होती. या बाबतीतला शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.

उद्यापासून म्हणजेच 1 जुलै 2024 पासून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेसाठीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया मोफत आहे. या योजनेचा अर्ज करताना स्वतः अर्जदार महिलेने त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्या कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कोठे सादर करू शकतो व अर्ज भरण्याची प्रक्रिया याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र (डोमेसाईल)/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक (पहिल्या पानाची झेरॉक्स)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणार या बाबतचे हमीपत्र

सदर योजनेचा अर्ज भरण्याची सुविधा-

या योजनेचा अर्ज हा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र येथे जाऊन पात्र महिलांना अर्ज करता येऊ शकतो.

सदर योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया-

  • अर्ज करण्याची सुरुवात- 1 जुलै 2024
  • अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत- 15 जुलै 2024
  • प्रारूप निवड यादी प्रकाशित- 16 ते 20 जुलै 2024
  • प्रारूप यादीवर हरकत/तक्रार करणे- 21 ते 30 जुलै 2024
  • लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित- 1 ऑगस्ट 2024
  • लाभ देण्यास सुरुवात- 14 ऑगस्ट 2024
  • त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक- प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *