शासनाचा मोठा निर्णय. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार. येथून करा अर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयांमध्ये आता मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या दोन्ही योजनांसाठी जर आपण अर्ज केला तर आता आपल्याला शंभर टक्के लाभ मिळणार आहे. कारण राज्य शासन व केंद्र शासनाने जे शेतकरी अर्ज करणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. शासनाच्या वतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेचा फायदा घ्यावा, अशी सूचना देण्यात आलेली आहे. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • सातबारा
  • 8 अ उतारा
  • बँकेचे पासबुक
  • फोटो

सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरावा. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या स्थितीला बंद आहे; परंतु अर्ज करण्याची प्रक्रिया ही 7 जुलै नंतर सुरू होणार आहे. या योजनेचा माध्यमातून आपण 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेच्या पंपासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी आपणास 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

जर आपण अर्ज करायचा असेल तर आपल्या जवळील ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता. पण सध्या अर्ज करण्याची वेबसाईट बंद आहे. परंतु पुढील 2 दिवसांमध्ये वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्यापर्यंत लेखातून माहिती सादर करण्यात येईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *