राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे असा की आता मुलींना उच्च शिक्षण हे मोफत मिळणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया मुलींना कशाप्रकारे मिळणार आहे याचा लाभ, यासाठीची पात्रता काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केले आहे व अनेक नवनवीन योजना सुरू केले आहेत.
त्याचबरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. या अर्थसंकल्पात आणखी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षणा हे मोफत मिळणार आहे. यासाठी काही अटी व शर्ती आहेत.
सदर योजनेचा लाभ किती मुलींना मिळणार आहे-
2 लाख 5 हजार मुलींना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ कोणत्या क्षेत्रातील मुलींना मिळणार आहे-
- अभियांत्रिकी
- औषध निर्माण शास्त्र
- वास्तुशास्त्र
- वैद्यकीय कृषी विषयक
सदर योजनेच्या अटी व शर्ती-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.
- या योजनेचा लाभ केवळ इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ कधीपासून मिळणार आहे-
या योजनेचा लाभ चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मुलींना मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे-
थोड्याच दिवसात यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

