मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शासन निर्णय आला, अर्ज कसा करता येणार आहे.

आज आपण सदर लेखातून महिलांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री ‘माजी लाडकी बहिणी योजना’ ची घोषणा केली होती. त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील प्रसारित करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे, या योजनेसाठीचा अर्ज कसा करता येणार आहे, या योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणती व या योजनेच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.

सदर योजनेची पात्रता-

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी.
  • विधवा, विवाहित, घटस्फोटीत व निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांचे स्वतंत्र बँक खाते असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर ते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे.

सदर योजनेसाठीचा अर्ज कोणाला करता येऊ शकत नाही-

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी अपात्र आहे.
  • ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी खात्यामध्ये किंवा जॉब करत आहे अशा महिलांना याचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो, त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र महिलेने याच्या अगोदर दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावाया.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • स्वतंत्र बँक खाते पासबुक (लाभार्थी महिलेचे)
  • अधिवास प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य)
  • उत्पन्नाचा दाखला (2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पनाचा)
  • पासपोर्ट साईजचे फोटो
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड

सदर योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे-

  • या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेसाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया ही 1 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
  • या योजनेसाठी महिलांना मोफत फॉर्म भरता येणार आहे.
  • ऑनलाइन फॉर्म भरत असताना महिला समोर उपस्थित गरजेचे आहे.

नोट-

  • 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *