अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ लागू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प मांडताना अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची व व्यापक अशा योजनेची मी घोषणा करत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब व सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळेल.
या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 46 हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. 2024 पासून या योजनेचे अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना-
लाभार्थी पात्रता- 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिला
अट- वर्षाला आवक 2,50,000 पेक्षा कमी असावी.
या योजनेचा माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. कमीत कमी 3.50 कोटी महिलांना याचा फायदा होण्याची आशा आहे.
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे-
- मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहेना योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार आहोत. महिलांच्या आर्थिक स्वालंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे व याचा फायदा 46 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
- मुलींमध्ये उच्च शिक्षणाचेप्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे व यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ
- महिलांच्या आरोग्याचा व स्वयंपाकातील इंधनाचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
- पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ संस्थापन केले जाणार.
- शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना कायम करणार
- जुलैपासून गाय दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान सुरू.
- कापूस, सोयाबीन उत्पादकांनाही हेक्टरी 5 हजार रुपये देणार.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.