आजपासून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन. 40 रुपये दूध दर देण्याची मागणी.

किसान सभा ही राज्यभर दुधाला योग्य दर मिळावा म्हणून आंदोलन करणार आहे, दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी आजपासून आंदोलन करणार आहे. अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. दुधाला 40 रुपये दर मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केलेली आहे. दूध उत्पादक करणाऱ्या व्यवसायिकांना तोटा सहन करावा लागल्याने तीव्र नाराजी दिसून येत होती, आता या नाराजीचा उद्रेक हा आंदोलनाच्या स्वरूपात झाला आहे.

रस्ता रोको उपोषण सुरू केली आहेत. या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारने दूध उत्पादकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या द्वारे आव्हान करण्यात आले आहे. आजपासून राज्यात आंदोलन सुरू होत आहे. दूध उत्पादकांचा विविध मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी अशी मागणी ते करत आहेत.

अनुदानात वाढ करून ते प्रतिलिटर 10 रुपये करावे-

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी हे प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करत आहेत. आता दूध उत्पादनातील वाढता तोटा हा सहन शक्तीच्या पलीकडे गेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर येथील अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 35 रुपये दर द्यावा व बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहून अनुदानात वाढ करावी. प्रतिलिटर 10 रुपये अनुदानात वाढ करून प्रतिलिटर 10 रुपये करावे. त्याचबरोबर अनुदान बंद काळात दूध घातलेले शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे, अश्या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

दूध धोरण दीर्घकालीन तयार करावे-

  • कायमस्वरूपी दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन उपाययोजनांच्या बरोबरच दीर्घकालीन धोरण तयार करण्याची खूप गरज आहे.
  • दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा म्हणून उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करण्यात यावे.
  • दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी
  • पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावे
  • खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा
  • दुध भेसळ रोखावी.
  • अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा
  • मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी
  • राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर असणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *