एनसीसीएफने या आठवड्यात कांद्याला किती बाजार भाव केला जाहीर!

गेल्या काही दिवसांपासून नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने क्विंटलला 2940 रुपयांचा बाजार भाव दिला आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांकरता एकच भाव असल्याचे निदर्शनास आले आहे.

आजच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला क्विंटल मागे सरासरी 2751 रुपये तर पिंपळगाव बाजार समिती 3000 रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे. या आठवड्यातील बाजार भाव हा 2940 रुपये ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बाजार अहवालानुसार पिंपळगाव बाजार समितीच्या भावाचा विचार केला तर जवळपास 60 रुपयांचा तर लासलगाव बाजार समितीच्या भावात 150 रुपयांचा फरक दिसून येत आहे.

मंगळवारी कांद्याला बाजार समितीमध्ये चांगले दर मिळाले होते. परंतु कालच्या बाजारभावानुसार त्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये 150 रुपये तर पिंपळगाव बाजार समिती 250 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.

कालचे बाजार भाव-

येवला बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजारात 2751 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2850 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 2850 रुपये, कळवण बाजारात 2500 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, पिंपळगाव बसवंत व देवळा बाजारात 3000 रुपयांचा दर मिळाला. परवा दिवशीच्या बाजार दरापेक्षा कालचे उन्हाळी कांद्याच्या बाजार दरात घसरण दिसून येत आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *