सिबिल स्कोर’ शिवाय आता शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता शेतकऱ्यांना पीक कर्ज सिबिल स्कोर शिवाय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीची 163 वी बैठक ही सह्याद्री अतिगृहावर येथे पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेती हे महाराष्ट्राची शक्ती आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान आणि प्रगतशील आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आमचा शेतकरी हा प्रामाणिक व स्वाभिमानी आहे. परंतु दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्यावर संकटे ही येत राहतात.

अशावेळी आम्ही शासन म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत व तसेच संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या निकषाहून दुपटीने मदत केली आहे, हेक्टरी मर्यादा ही वाढवली आहे. एक रुपयात पिक विमा दिला आहे. बँकांनी जर त्यांना संकट काळात आर्थिक पाठिंबा दिला नाही, तर अन्य मार्गाने पैसे उभे करावे लागतात. त्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन हे खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठिंबा दिला पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची सक्ती केली जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

या वेळेस समितीने सादर केलेल्या राज्याच्या 2024-25 साठीच्या 41,286 कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवावेत असे निर्देशही देण्यात आलेले आहेत.

सिबिल स्कोर म्हणजे काय?-

  • सिबिलचा फूल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड असा आहे. ही एक कंपनी आहे जी बँक खातेदारांचा आर्थिक डाटा संकलित करत असते.
  • या डाटाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची कर्ज घेण्याची व ती फेडण्याची पत किती आहे हे दर्शवते. त्याचबरोबर त्यानुसार त्याला गुण दिले जातात, त्यालाच सिबिल स्कोर असे म्हटले जाते.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *