3 कोटी नवीन घरकुल योजना. प्रत्येकाला मिळणार घर, जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

आज आपण सदर लेखातून केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. भारत देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न मोदी सरकारचे होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीएम घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली होती.

पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यात आणखी एक भर म्हणून 3 कोटी नवीन घरकुल योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर या माध्यमातून मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे, अर्ज कोठे करावा. पात्रता, कागदपत्रे कोणती याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.  

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी खात्यात नोकरी करत नसावा.
  • कुटुंबाचे रेशन कार्ड असावे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर

सदर योजनेसाठी अर्ज कोठे करावा-

3 कोटी घरकुल योजनेसाठी सध्या फक्त मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन अर्ज हे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *