शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीशी निगडित काही शंका तसेच समस्या असतील तर या टोल फ्री नंबरवर कॉल करा.

राज्यात खरीप हंगाम सुरू झालेला आहे व त्याचबरोबर शेतकरी शेतात पीक लावण्याचा तयारीला देखील लागलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना शेतीशी निगडित अनेक प्रश्न पडत असतात. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व समस्यांचे समाधान करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष सुरू करण्यात आले आहे.

हे कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्क करण्यासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन नंबर व 9822446655 हा मोबाईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाशी संपर्क साधू शकता तसेच कधी संपर्क साधू शकतात.

कोण कोणत्या शंकांचे निरसर करण्यासाठी व कधी शेतकरी संपर्क साधू शकतात-

  • संपूर्ण वर्षभर हे कक्ष सुरू आहे.
  • त्याचबरोबर खरीप रब्बी हंगामातील खते, बियाणे, कीटकनाशके यांची किंमत, उपलब्धता, गुणवत्ता याबाबत शंका निरसन करण्यासाठी
  • मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निर्विष्ठ व गुण नियंत्रण, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी संबंधित शंकाचे निरसन करण्यात येईल.
  • जर शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संपर्क क्रमांक व कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.

टोल फ्री क्रमांक- 9822446655

  • या क्रमांकावर आपण केवळ संदेश पाठवू शकता.
  • त्याचबरोबर खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपूर्ण क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअपवर पाठवता यावा यासाठी हा क्रमांक उपलब्ध आहे.

आवाहन-

  • शेतकरी मित्रांनो सदर टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधून व मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
  • हा टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत सुरू राहील.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *