प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना हक्काची घरे मिळाली आहेत. आता या योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
देशात पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून आणखी 3 कोटी घर बांधण्यावर मोदी यांनी एक मत दर्शवले आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते. त्यांना आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आता घराबरोबर शौचालय, वीज, एलपीजी गॅस कनेक्शन जोडणी, नळ जोडणी अशा सगळ्या सुविधा दिल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय आहे? या योजनेचा कशाप्रकारे लाभ मिळतो? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
पीएम आवास योजना काय आहे-
पीएम आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना घर बांधून दिले जातात. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. ही योजना देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी चालू करण्यात आली आहे. आता या योजनेचा आणखी विस्तार करण्यात आलेला आहे. गरिबांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंतच्या लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी या योजनेच्या माध्यमातून निधी दिला जातो.
या योजनेचा लाभ देण्यासाठी उत्पन्नाच्या आधारावर अनेक गट पाडण्यात आलेले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. या कर्जावर अनुदानही मिळायचे. आता या कर्जाची मर्यादा 18 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो.
सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-
- या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येत आहे अगोदर ठरवावे
- त्यानंतर या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- आता मुख्य मेनू मध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करावे व अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करावे.
- नंतर नवीन एक विंडो ओपन होईल. तिथे तुमचा आधार क्रमांक टाकावा.
- त्यानंतर वैयक्तिक माहिती, बँक खाते संदर्भातील माहिती, तुमच्या सध्याच्या घरचा पत्ता इत्यादी माहिती भरावी.
- ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकावा व पूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून सबमिट करावी.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- आयटी रिटर्न
- फॉर्म क्रमांक 16
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.