आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कुक्कुटपालन करण्यासाठी आता 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे?, त्याचबरोबर या अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? अर्ज कोठे करावा? याबद्दलची सविस्तर माहिती आपण सदर लेखातून पाहणार आहोत.
पशुपालन हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय फायद्याचा असल्यामुळे जास्त लोक पशुपालन व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आता या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कुकूटपालन व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा मिळवून व्यावसायिकांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी ही योजना राबवली जात आहे.
10 लाख रुपयापर्यंत अनुदान असे मिळवा?-
ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन अभियान यांच्यामार्फत 10 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी 50 टक्के अनुदान शासन देत असून संबंधित पशुपालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे.
10 लाख रुपये अनुदान कसे मिळवावे?-
त्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. तेथे तुम्हाला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.