आज आपण सदर लेखातून महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जे व्यवसायिक दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणारी मदत ही फायद्याची असणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी व इतर इच्छुक व्यक्ती आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात.
तसेच आपले उत्पन्न वाढवू शकतात. दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने दोन महत्त्वाच्या योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सुधारित योजनेच्या माध्यमातून शेतकरी व इतर इच्छुकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत मिळणार आहे. या अगोदर दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन यासाठी दोन स्वतंत्र योजना राबवल्या जात होत्या.
आता त्यांचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा विकास अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. शेतकरी उत्पादक संस्था, खासगी कंपन्या, वैयक्तिक उद्योजक, सेक्शन 8 नोंदणीकृत कंपन्या, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग व सहकारी दूध संघ यांना घेता येणार आहे.
सदर योजनेत काय समाविष्ट आहे?-
- यामध्ये नवीन व विद्यमान दुग्ध प्रक्रिया केंद्रामध्ये गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ दुग्ध प्रक्रिया व पॅकेजिंग.
- विपणन पायाभूत सुविधा, दूध वाहतूक सुविधा व संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन.
- नैसर्गिक स्रोतांकडून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व पशुखाद्य निर्मिती बळकटीकरण यांच्यासारख्या सुविधांसाठी मदत.
सदर योजनेचा लाभ कसा घ्यावा?-
- या योजनेबाबत अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.
- तसेच आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत व पात्रता निकष पूर्ण करावा.
- मंजुरी मिळाल्यानंतर कर्जासाठी बँकेकडे अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 3 टक्के व्याज सवलत मिळते.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.