आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार मोफत उपचार.

आपल्या शासनाच्या माध्यमातून आरोग्यविषयक खर्च कमी व्हावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार दिले जातात या योजनेची व्याप्ती अजून वाढावी म्हणून राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. शासनाने पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना सुद्धा जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याच्या सूचना-

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनी आपली शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करून घ्यावी, असा आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण करणारे अधिकारी तसेच उपनियंत्रक शिधावाटप मुंबईच्या विभागांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिकेशी आधार क्रमांक संलग्न करणे गरजेचे आहे.

या दोन्ही योजना एकत्रित राबवण्याचा निर्णय-

25 फेब्रुवारी 2019 सालच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 जुलै 2023 मध्ये आणखी एक आदेश जारी करून राज्य सरकारने पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असे जाहीर केले होते. याच अदेशाची आता अंमलबजावणी केली जात आहे. परंतु त्यासाठी पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना आपल्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याची प्रक्रिया चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जातो. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *