आपल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे नुकती संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची 52 वी बैठक पार पडली आहे. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 52 व्या बैठकीत या तीन दिवसांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ऊसाच्या या नवीन वाणाचे परीक्षण करण्यात आले आहे.
ऊस हे महाराष्ट्र राज्यातील एक नगदी पीक आहे. पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाडा आणि उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात ऊसाची लागवड केले जाते. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी ऊसाची ही नवीन जात नक्कीच शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे.
सदर ऊसाच्या वाणा बद्दलची माहिती-
महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले ऊस 15006’ (MS 16081) हा ऊसाचा नवीन वाण प्रसारित केला आहे.
सदर ऊसाच्या वाणाची वैशिष्ट्ये–
- फुले ऊस 15006 हे वाण अधिक उत्पादन देणारी जात असल्याचे दावे शास्त्रज्ञांनी केले आहेत.
- त्याचबरोबर हा एक मध्यम कालावधीत परिपक्व होणारा वाण असणार आहे.
- या वाणाची विशेषता म्हणजे यामध्ये साखरेचा उतार हा इतर जातीच्या तुलनेत अधिक आहे.
- तसेच ही जात न लोळणारी आहे. सध्या राज्यात पूर्व हंगाम आणि आडसाली लागवड ही राज्यात चालू असल्यामुळे हा वाण लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
- हा वाण नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे, कारण यामधून अधिक ऊस व साखर उत्पादन मिळणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.