नाफेडचा या आठवड्यातील कांदा खरेदीचा दर निश्चित.

नाफेडचा या आठवड्यातील कांदा खरेदीचा दर निश्चित केला असून त्यानुसार 2555 रुपये प्रतिक्विंटल असा दर ठरवण्यात आलेला आहे. मागील दोन आठवडे हा दर फक्त 2105 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मात्र नाफेड करून हे दर वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार दरात वाढ झाली.

परंतु बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. त्या तुलनेत नाफेडचा दर कमीच असल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याला गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमध्ये समाधानकारक दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नाफेड खरेदी करत असल्याचा कांद्याचे दर निश्चित करण्याचा अधिकार ‘डोका’ला मिळाल्या नंतर पहिल्या आठवड्यासाठी 21000 रुपये प्रतिक्विंटल दर ठरवला.

परंतु बाजार भावापेक्षा हा दर 500 ते 600 रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एनसीसीएफचा खरेदीकडे पाठ फिरवली. पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. त्यानुसार या आठवड्यातील नाफेडच्या कांदा खरेदीचा दर हा 2555 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. परंतु मागील दोन आठवडे हा दर 2105 रुपये प्रतिक्विंटल इतका होता.

दिल्लीतून ठरवण्यात आलेले नाफेडचे कांदा दर कमीच-

या अगोदर नाफेडच्या कांद्याचा दर स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवला जात होता. परंतु आता नाफेडचा कांदा दर हा दिल्लीतून ठरवण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे सरकारकडून सांगण्यात येत होते.

परंतु प्रत्यक्षात आजही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याच्या लिलावाला मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेडचे दर हे कमीच आहेत. मागील दोन आठवड्यातील नाफेडच्या कांदा खरेदीचे दर प्रतिक्विंटल 2105 रुपये होता. परंतु या आठवड्यात दर वाढूनही बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा तफावत पाहायला मिळत आहे.

हीच परिस्थिती राहिली तर नाफेडला कांदा दिला जाणार नाही…-

मंगळवारी दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यातील नाफेडचा कांदा खरेदीचा दर 2555 रुपये प्रतिक्विंटल इतका ठरवला आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याच्या लिलावाला 2800 ते 3000 रुपयांपर्यंत प्रत्येक प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

परंतु असे असतानाही सरकार नाफेडच्या माध्यमातून भरपूर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर मात्र बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व एनसीसीएफला कांदा दिला जाणार नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *