आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला माहितीच आहे की काल पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता हा 5:00 वाजता वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे.
परंतु अजून देखील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जर पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जमा झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करावे या विषयाची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. जर पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाला नसेल तर खालील दिलेली दोन कामे करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपणास पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळणार नाही.
तात्काळ करा ही दोन कामे-
- सर्वात अगोदर शेतकऱ्यांनी आपल्या पीएम किसान योजनेची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते पहावे.
- ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या अगोदर पैसे जमा होत होते, परंतु सध्या स्थितीला पैसे जमा होत नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडावे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now