धरणातील पाण्याची पावसाच्या उघडीपी नंतर अवक घटली.

मागील चार ते पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली आहे. अनेक ठिकाणी ऊन देखील पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक घटली आहे. सोमवारी (ता.17) रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 0.51 टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली होती. धरणात नव्याने एकूण 10.48 टीएमसी एवढे पाणी दाखल झाले आहे.

सध्या जिल्ह्यातील 26 धरणातील पाण्याची उपयुक्त क्षमता ही 198.34 टीएमसी आहे. मागील वर्षी जवळपास ही सर्व धरणे भरली होती. यावर्षी देखील हवामान विभागाने 106% पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार साधारणपणे 7 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक होत होता. काही धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा अधिक होता. यामध्ये मुठा, निरा, कुकडी व भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळखळून वाहू लागले. धरणा सुरुवातीला कमी आवक होती.

परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरण्यात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली होती. निरा व भीमा क्षेत्रात चांगला पाऊस पडला. या क्षेत्रात 144 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. उजनी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे. आत्तापर्यंत उजनीत 6.26 टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनीत पाणीसाठा उणे 25.89 टीएमसी म्हणजे उणे 48% झाला आहे.

त्याचबरोबर 1 ते 17 जून या कालावधीत टेमघर क्षेत्रात 109 मिमी पाऊस पडला. तर वरसगाव 85, खडकवासला 94, पवना 84, कासारसाई 56, कळमोडी 57, चासकमान 104, भामा आसखेड 37, आंध्रा 35, वडीवळे 18, नाझरे 157, गुंजवणी 114, भाटघर 131, निरा देवघर 74, वीर 115, पिंपळगाव जोगे 24, माणिक डोह 52, येडगाव 80, वडज 22, डिंभे 55, चिल्हेवाडी 21, घोड 160, विसापूर 103 या ठिकाणी एवढा मिमी पाऊस पडला. त्यामुळे मागील आठवड्यात धरणात दररोज अर्धा ते पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली होती.

1 ते 17 जून या कालावधीत झालेला पाणीसाठा-

  • मुठा- 1.24
  • निरा- 1.14
  • कुकडी- 1.48
  • उजनी- 6.26
  • एकूण- 10.48

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *