आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय घेतला आहे. श्री. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच पहिला निर्णय हा शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन घेतला आहे.
शेतकऱ्यांना 17वा हप्ता देण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे व त्याचबरोबर हप्ता किती तारखेला मिळणार आहे याविषयी देखील माहिती दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना जर हा 17वा हप्ता मिळवायचा असेल तर काही महत्त्वाची कामे करणे देखील आवश्यक आहेत. त्यासाठी हा लेख शेतकरी बांधवांनी संपूर्ण वाचावा जेणेकरून आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
लगेच करा हे काम-
- सर्वात अगोदर आपल्या पीएम किसान योजनेची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते पहावे. जर ई-केवायसी झालेली नसेल तर सर्वात अगोदर करून घेणे गरजेचे आहे.
- ज्या शेतकरी बांधवांना थोडे हप्ते मिळालेले आहेत व बाकीचे हप्ते मिळाले नाहीत त्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये लगेच उघडावे.
पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे?-
पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.