पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात अजून जमा झालेले नसतील तर येथे करा तक्रार. तसेच हप्ता जमा झाला की नाही ते कसे तपासावे?

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज आपण सदर लेखातून पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे पहावे? तसेच जर पैसे जमा झाले नसतील तर तक्रार कोठे करावी? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा भार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा मंगळवारी 18 जून रोजी  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत.

तात्काळ करा ही दोन कामे-  

  • सर्वात अगोदर शेतकऱ्यांनी आपल्या पीएम किसान योजनेची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते पहावे.
  • ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या अगोदर पैसे जमा होत होते, परंतु सध्या स्थितीला पैसे जमा होत नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडावे.

सदर योजनेच्या माध्यमातून खात्यात अजून पैसे जमा झालेले नसतील तर येथे करा तक्रार-

परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना जर ही रक्कम मिळालेली नसेल तर त्यासाठी काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. जर त्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर ही रक्कम बँक खात्यात जमा झालेली नसेल. परंतु काही शेतकऱ्यांनी जर सर्व अटीची पूर्तता करून देखील सुद्धा खात्यात 2000 रुपये जमा झालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करावी.

  • जर पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर अधिकृत वेबसाईट वरती देखील तक्रार नोंदवता येते.
  • त्यासाठी हेल्प डेस्क या ऑप्शन वर क्लिक करावे.
  • त्यानंतर आधार नंबर, बँक खाते क्रमांक व मोबाईल नंबर द्यावा.
  • आता डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करावे.
  • त्यानंतर क्वेरीचा अर्ज मिळेल. त्यामध्ये आधार नंबर, बँक खाते क्रमांक व मोबाईल नंबर भरावा. तसेच समस्या काय आहे ते नमूद करावे व सबमिट करावे.
  • या योजनेचे काम पाहणाऱ्या pmkisan-ict@gov.inpmkisan-fund@gov.in  या अधिकृत ई-मेल आयडी वरती शेतकरी याबाबतची तक्रार करू शकतात.
  • तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मार्फत हेल्पलाइन नंबर देखील जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी 0120-6025109, 011-24300606 किंवा 155261 या हेल्पलाइन नंबर वरती देखील तक्रार करू शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात आला आहे. 1800-115-526 या टोल फ्री नंबर वरती देखील आपली तक्रार दाखल करू शकता.

सदर योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसे तपासावे?-

  • सर्वात अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर लाभार्थ्याच्या यादीवर जावे. त्यात तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकावा.
  • सर्वात शेवटी ‘Get Data’ वर क्लिक करून पेमेंट स्टेटस चेक करा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *