मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 नुसार ग्रामपंचायत गावात असण्यासाठी किमान गावात 600 लोकसंख्या असणे आवश्यक आहे तर डोंगराळ भागात हे प्रमाण 300 लोकसंख्याचे आहे. सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पुरवता यावा यासाठी जिल्हा पातळी व ग्रामपंचायत असे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत ही गावचा कारभार चालवत असते. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या योजनांना गावातील नागरिकांपर्यंत देखील पोहोचवत असते. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया की यावर्षी म्हणजे 2024 मध्ये ग्रामपंचायत पातळीवर कोणकोणत्या योजना लागू करण्यात आलेले आहेत.
ग्रामपंचायतीची कामे कोण कोणती आहेत-
गावचा कारभार सुरळीत व योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतेची कामे चालतात. चला तर मग जाणून घेऊया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेमकी कोणती कामे केली जातात.
- गावातील रस्त्याची दुरुस्ती करणे
- गावात रस्ते बांधणे
- दिवाबत्तीची सोय करणे
- सार्वजनिक स्वच्छता ठेवणे
- गावातील जन्म मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे
- सांडपाण्याची व्यवस्था करणे
- सार्वजनिक स्वच्छता ठेवणे
- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे
- शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे.
- शेती विकासासंबंधी योजना राबवणे
- जत्रा, गावचा बाजार, उत्सव, उरुस यांची व्यवस्था पाहणे
- ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणारे कर व शासनाकडून येणारा निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करणे.
ग्रामपंचायत केंद्र पुरस्कृत योजना-
- कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधणे
- महालक्ष्मी सरस प्रदर्शन
- श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान
- राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
- दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना
- महिला किसान सशक्तिकरण कार्यक्रम
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन
- प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
- राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना
ग्रामपंचायत राज्य पुरस्कृत योजना-
- वित्त आयोग
- स्मार्ट ग्राम योजना
- तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
- ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान
- जिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामाकरिता सहाय्यक अनुदान
मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण विकास-
2005 साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा सुरू करण्यात आला. या कायद्यानुसार ग्रामीण भागातील गरजू व काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
- nrega.nic.in/stHome.aspx या लिंक वर जाऊन तुम्ही मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
- मुख्य पानावर गेल्यावर तुम्हाला भारतातील सर्व राज्यांची नावे दिसतील. त्यामध्ये आपलं राज्य म्हणजेच Maharashtra असा पर्याय निवडावा.
- त्यानंतर महाराष्ट्रातील आपला जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत निवडावी.
- आता सर्च बटन वर क्लिक करून तुमच्या गावच्या ग्रामपंचायत येथील मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या योजना दिसतील.
- या योजनेच्या माध्यमातून कोणी कोणी लाभ घेऊ शकते हे देखील तुम्ही यात पाहू शकता.
- मनरेगा योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार पुरवले जातात त्याची एक यादी तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकता
ग्रामपंचायत व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य-
ग्रामपंचायत व पंचायत विभाग महाराष्ट्र राज्य यांची rdd.maharashtra.gov.in/state ही अधिकृत वेबसाईट आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

