आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 17व्या हप्त्याचे 2 हजार रुपये जमा होतील. मोदींनी किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून यंदा सुमारे 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मात्र अधिकृत वेबसाईट ठप्प-
किसान सन्मान निधी 17व्या हप्त्याची घोषणा झाली होती व आता तारीख देखील जाहीर झालेली आहे. परंतु या योजनेचे अधिकृत वेबसाईट ठप्प झाली असून अनेक तासांनी देखील वेबसाईट चालू झालेली नाही. 12 जूनच्या संध्याकाळपासून ते 13 जूनच्या सकाळपर्यंत वेबसाईट ठप्प झालेली आहे. त्यामुळे ई-केवायसी सुविधेचा लाभ मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळतील की नाही याची चिंता वाटत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खाते स्थिती, लाभार्थी यादी पाहणे यासारखी कामे देखील अडचणीत येत आहेत.
यामुळे वेबसाईट ठप्प-
पीएम किसान पोर्टल हे देखभालीच्या कामामुळे 12 जून 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत उपलब्ध नसेल, अशी सूचना पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली होती. परंतु आता 13 जून रोजी सकाळी देखील पोर्टल कार्यान्वित झालेले नाही. वेबसाईट कधी पूर्णवत होईल याबाबत अजून कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.
या हेल्पलाइनची मदत घ्या-
शेतकरी वेबसाईट ठप्प झाल्यामुळे चिंतित झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यादरम्यान अडचणीची सोडवणुक म्हणून कृषी विभागाकडून पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. 011-24300606, 155261 या क्रमांकावर फोन करून आपण आपल्या समस्या सोडू शकता, असे विभागाने सांगितले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.