पीएम किसान योजनेचा बाबतीत तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

आज आपण सदर लेखातून पीएम किसान योजनेच्या बाबतीत पडणाऱ्या अनेक प्रश्नांची म्हणजेच बँक खाते कसे बदलायचे? घरात किती जणांना लाभ मिळतो? लाभ पैसे खात्यात येण्यासाठी काय करावे? पैसे जमा झाला की नाही ते कसे पहावे? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यासाठीची प्रक्रिया देखील जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सतरावा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे.

त्याची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी रुपये आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा होतात. या योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांचे नाव लाभार्थ्याच्या यादीत असतील. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घरबसल्या तपासता येईल.

सदर योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ मिळणार आहे?-

  • पीएम किसान योजनेच्या सुरूवातीला दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच याचा लाभ मर्यादित होता. परंतु त्यानंतर आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
  • परंतु आता जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ही जमीन अर्जदाराच्या नावावर 1 जानेवारी 2019 अगोदर नोंदणीकृत असावी. त्याचबरोबर अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी आणि NPCI शी लिंक असणे गरजेचे आहे.

सदर योजनेसाठीचे बँक खाते कसे अपडेट करावे?-

  • सर्वात अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर ‘अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स’ या पर्यायावर क्लिक करावे. हा पर्याय तुम्हाला होम पेजवर दिसेल.
  • नंतर तुमचा आधार क्रमांक टाका व डेटा मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा सर्व तपशिल तुमच्यासमोर येईल.
  • त्यानंतर तुम्ही सर्वात शेवटी संपादन वर क्लिक करून तुमचे बँक खाते अपडेट करू शकता.

सदर योजनेचे पैसे कोणाच्या खात्यात येत नाहीत?-

  • ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील एकच सदस्य घेऊ शकतो.
  • जर वय हे 18 वर्षापेक्षा कमी असेल तर
  • जर कुटुंबात सदस्य सरकारी कर्मचारी किंवा अनिवासी भारतीय असेल तर
  • जर दहा हजार रुपये पेक्षा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जास्त पेन्शन मिळत असेल तर
  • कुटुंबातील कोणताही व्यक्ती डॉक्टर, सीए किंवा वकील असेल तर

सदर योजनेचे पैसे का जमा होत नाहीत?-

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही किंवा त्याचबरोबर काही कारणास्तव खाते बंद पडलेले आहे किंवा नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत.

सदर योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी काय करावे?-

  • ज्या शेतकऱ्यांनची ई-केवायसी करायची राहिली आहे अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून घ्यावी.
  • जरी 16वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्त्यावेळी किंवा त्या आधी वितरित करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही.

सदर योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसे तपासावे?-

  • सर्वात अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर लाभार्थ्याच्या यादीवर जावे. त्यात तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकावा.
  • सर्वात शेवटी ‘Get Data’ वर क्लिक करून पेमेंट स्टेटस चेक करा.

नोट-

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी 1800-115-5525 या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करावा.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *