आपण आज सदर लेखातून महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पीएम शिलाई मशीन अनुदान योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. यामध्ये आपणास 5 ते 10 दिवसांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे व त्याचबरोबर प्रत्येक दिवशी प्रशिक्षणाचे तुम्हाला 500 रुपये देण्यात आलेल्या आहेत. तसेच शिलाई मशीन घेण्यासाठी आपल्याला 15,000 रुपये इतके अनुदान देखील देण्यात येणार आहे. यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते सदर लेखातून पाहूया.
सदर योजनेची माहिती-
या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन घेण्यासाठी महिलांना 15 हजार रुपये मिळणार आहेत व 5 ते 10 दिवस प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रशिक्षणाचे आपल्याला एका दिवसाचे 500 रुपये इतकी रक्कम देखील मिळणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड लेटेस्ट अपडेट
- नॅशनल बँक पासबुक
- आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर
- पॅन कार्ड असेल तर
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-
- जर महिलांना या शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
- अर्ज केल्यानंतर हा अर्ज आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जातो. तेथून प्रोसेस झाल्यानंतर पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी व त्यानंतर राज्याच्या ठिकाणी जाऊन तेथून पुढे खादी व ग्रामोद्योग यांच्याकडे जातो.
- यानंतर खादी व ग्राम उद्योग या संस्थेमधील काही लोक आपल्या गावात येतात व आपल्याला पाच ते दहा दिवसांचे प्रशिक्षण देऊन प्रति दिवस 500 रुपये भत्ता देऊन 15000 शिलाई मशीन साठी त्यामध्ये दिले जातात.
सदर योजनेच्या अटी व शर्ती-
या योजनेचा अर्ज भरताना ज्या व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे, तो व्यक्ती प्रत्यक्ष समोर असणे गरजेचे आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.